जालना - वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विशेष करून बालकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढल्याचे आज दिसून आले. सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आज नोंदणी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी शहरातील वसतिगृहांच्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय होती.
जालन्यात संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ, रुग्णालयात गर्दी - Jalna Health News
जालन्यात वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागामध्ये संसर्गजन्य आजाराच्या ७०० रुग्णानी आज नोंदणी केली.
![जालन्यात संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ, रुग्णालयात गर्दी increased prevalence in infectious disease patients in jalna](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5954167-431-5954167-1580816732910.jpg)
संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्य पचंड वाढसंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्य प्रचंड वाढ
संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्य पचंड वाढसंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्य प्रचंड वाढ
सकाळी 9 ते 12 यावेळी दरम्यान सामान्य रुग्णालयातील नोंदीनुसार सुमारे 700 रुग्णांनी नोंदणी केली. यामध्ये लहान मुलांचे जास्त प्रमाण होते. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांसह मोठा माणसांनादेखील सर्दी, खोकला, कोरडा खोकला, असे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. अशा रुग्णांना सुरुवातीला दोन-तीन दिवस प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर आवश्यकता पडल्यास त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात येईल अशी माहिती येथील डॉक्टरांनी दिली.