जालना -पूर्वीचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणजेच आत्ताचा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग. ही दोन्ही नावे एकच आहेत. या कार्यालयामध्ये ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे. अशा ग्राहकांच्या तक्रारींची संख्या वाढत आहे. आज जागतिक ग्राहक हक्क दिन. या दिनाच्या निमित्ताने या आयोगाच्या अध्यक्ष नीलिमा किशोर संत यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत या आयोगाच्या सदस्य नीता कांकरीया यांची पण उपस्थिती होती.
काय आहे दिनाचे महत्त्व -
आज 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, सध्या covid-19 महामारीचा परिणाम यावर झालेला आहे. त्यामुळे कुठलाही उपक्रम न घेता शब्द सुमनांच्या शुभेच्छा देऊनच हा दिन साजरा केला. 14 एप्रिलला अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज एफ केनेडी यांनी अमेरिकेच्या सिनेटमध्ये पहिल्यांदा ग्राहक हक्काची संकल्पना मांडली. त्यामुळे 15 एप्रिल हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक 24 डिसेंबर या दिवशी भारतामध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला, त्यामुळे 24 डिसेंबर हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो .
दोन वर्षातील तक्रारी -
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सन 2019 मध्ये 424 तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यापैकी 336 तक्रारी निकाली लागल्या आणि 88 तक्रारींचा निपटारा सुरू आहे. 2020 मध्ये पूर्ण वर्ष कोरोना ने ग्रासले होते. असे असतानाही एकूण 484 तक्रारी दाखल झाल्या त्यापैकी 164 तक्रारींच्या निकाल लागला आहे तर 320 तक्रारींची सुनावणी सुरू आहे
20 जुलैपासून नवीन ग्राहक संरक्षण कायदा -
1986 ला ग्राहक संरक्षण कायदा अमलात आला. त्यावेळेपासून या कायद्यात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते, ते बदल 2019 मध्ये करण्यात आले, आणि 20 जुलै 2020 पासून नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे.