जालना -राज्यातील ४ प्रमुख स्टील री-रोलिंग मिलवर आयकर विभागाकडून 23 सप्टेंबर छापा टाकण्यात आलाहोता. यावेळीजालनासोबतच महाराष्ट्रातील औरंगाबाद, पुणे, मुंबई, तर देशात कोलकातासह 32 पेक्षा अधिक ठिकाणी आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला होता.
२०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जप्त -
या कारवाईत आयकर विभागाकडून काही कागदपत्रे, सैलपत्रके आणि डिजीटल पुरावे जप्त करण्यात आले. यावेळी २०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे. शेल कंपन्या वापरून शेअर प्रीमियम आणि असुरक्षित कर्जाच्या वेषात कंपन्यांनी मिळवलेले बेहिशेबी उत्पन्न समोर आले असून 200 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी खरेदीचे पुरावे आयकर विभागाला सापडले आहेत. कंपन्यांच्या कारखाना परिसरातही मोठ्या प्रमाणात बेहिशेबी साठा सापडल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. तसेच आयकर विभागाला शोधमोहिमेदरम्यान 12 बँक लॉकर्स सापडले आहेत. 2.10 कोटी कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि दागिने 1.07 कोटी रुपयांचे दागिने आयकर विभागाने जप्त केले आहे.
हेही वाचा - नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी बीएमसी करणार १३०० कोटी खर्च; दहिसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचे होणार सौंदर्यीकरण