जालना -कोरोना बाधित रुग्णांच्या चाचण्यामध्ये अत्यंत मोलाची भुमिका बजावणाऱ्या इम्यूनोसे मशिन व रुग्णांना रुग्णालयात पोहोविण्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त अशा दोन कार्डियाक रुग्णवाहिकांचे आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
इम्यूनोसे मशीन आणि कार्डियाक रुग्णवाहिकांचे राजेश टोपे यांच्याहस्ते लोकार्पण - जालना कोविड बातमी
कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या चाचण्यांसह इतर चाचण्या करणारी इम्यूनोसे ही मशिन तसेच रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सर्व सुविधायुक्त अशा दोन कार्डियाक रुग्णवाहिकांचे आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या चाचण्यांसह इतर चाचण्या करणारी इम्यूनोसे ही मशिन आहे. या मशिनच्या माध्यमातुन डी-डायमर, सेरीटीन, ट्रोपोनीन-आय, सीआरपी, प्रो कॅल्सीटोनीन सायटोकाईन स्ट्रॉम या चाचण्यांसह कोविडबाधित रुग्णांच्या शरीरामधील अँडीबॉडीजची पातळी तपासून रुग्णांना या माध्यमातून प्लाझ्मा देणे सोईचे होणार आहे. तसेच या मशिनच्या माध्यमातून शरीरातील हार्मोन्स, कॅन्सर तसेच शरीरामधील व्हिटामीनच्या तपासण्याही करणे शक्य होणार असल्याने ही मशिन रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. तसेच सर्व सोयी-सुविधांनीयुक्त अशा दोन रुग्णवाहिकांचेही लोकार्पण करण्यात आले असुन रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी म्हटले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. सुर्यकांत ह्यातनगरकर, डॉ. संजय जगताप, डॉ. शेजुळे, डॉ. सर्वेश पाटील, डॉ. साळुंके, आदींची उपस्थिती होती.