जालना -जागेच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याला मारहाण झाल्यानंतर पुतण्याने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. जालन्यातील परतूर तालुक्यातील वाई या गावात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दीपक घाडगे, असे मृत तरुणाचे नाव आहे.
जागेच्या वादातून पुतण्याने स्वत:ला घेतले जाळून, जालना जिल्ह्यातील घटना - पुतण्या आत्महत्या वाई
जागेच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याला मारहाण झाल्यानंतर पुतण्याने स्वतःला जाळून घेतले. जालन्यातील परतूर तालुक्यातील वाई या गावात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दीपक घाडगे, असे मृत तरुणाचे नाव आहे.
दीपकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून परतूर पोलिसांत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या चुलत्याला अटक झाली आहे. दीपक स्वतःला जाळून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वाई गावात अंगणवाडी शेड असलेल्या जागेच्या हिस्स्यावरून 35 वर्षीय दीपक घाडगे आणि त्याचा चुलता मुक्तिराम घाडगे यांच्या वाद सुरू होता. या वादातून काल दुपारी ४ वाजता दीपकला त्याचा चुलता मुक्तिराम आणि इतरांनी काठ्या - लाठ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर या सर्व लोकांसमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन दीपकने स्वतःला पेटवून घेतले होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला विझवण्याचा प्रयत्न केला नाही. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या दीपक यास सुरुवातीला जालना आणि नंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविले. दरम्यान आज उपचार सुरू असताना दीपक याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दीपक याची पत्नी सपना घाडगे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांनी आरोपी मुक्तिराम घाडगे, अभिजित घाडगे, मीना घाडगे, अर्जुन येवले, परमेश्वर येवले आणि भीमा येवले या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -Arjun Khotkar : जालन्यात ईडीचे पथक दाखल; कागदपत्र तपासणीसह अर्जुन खोतकरांची चौकशी