भोकरदन (जालना) -तालुक्यातील टाकळी भोकरदन येथे कोरोनाने थैमान घातला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या एका दिवसाच्या चाचणीत १३१ नागरिकांपैकी ४३ रुग्ण बाधित आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडे तपासणीचे अहवाल येताच पिंपळगाव रेणुकाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकाऱ्यांसह पथक दाखल झाले व बाधित असलेल्या रुग्णांना तत्काळ कोविड सेंटरला हलविण्याची कारवाई सुरू केली. मात्र, कोणताही रुग्ण कोविड सेंटरमध्ये जाण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांची मदत घेण्यात आली. मात्र पोलिसांना पाहून रूग्ण पसार झाल्याचे पहायला मिळाले.
जालना : आरोग्य पथक व पोलिसांना पाहताच कोरोनाबाधित रूग्णांनी काढला पळ - कोरोनाबाधित गावकरी
गावात रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले. त्यानंतर शनिवारी २४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य चाचणी करण्यात आली. या चाचणीत ४३ जण कोरोनाबाधित आढळून आले.
सध्या कोरोना महामारीच्या तडाख्याने सगळे त्रस्त आहेत. ग्रामीण भागात आजही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत लग्न व इतर कार्यक्रम मोठ्या थाटात केले जात आहेत आणि अशीच बाब टाकळी घडली आहे. गावात रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले. त्यानंतर शनिवारी २४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य चाचणी करण्यात आली. या चाचणीत ४३ जण कोरोनाबाधित आढळून आले. तपासणीनंतर आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी ते अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले. या अहवालाच्या आधारे आरोग्य पथक गावात दाखल झाले. मात्र, बाधित रूग्णांनी पथकाला कोणताही प्रतिसाद न देता गावातून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पहायला मिळाले.