महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदनापूरात ट्रकमधील साडेसहा लाख रुपयाचे कपड्यांचे गठ्ठे चोरी - Jalna News

तालुक्यातील वरूडी येथे ट्रकमधील साडेसहा लाख रुपयांच्या कपड्याचे गठ्ठे चोरी होण्याची घटना घडली.

कपड्यांचे गठ्ठे चोरी
कपड्यांचे गठ्ठे चोरी

By

Published : Jan 5, 2021, 7:36 PM IST

बदनापूर (जालना)- तालुक्यातील वरूडी येथे ट्रकमधील साडेसहा लाख रुपयांच्या कपड्याचे गठ्ठे चोरी होण्याची घटना घडली. नूर हॉस्पिटलसमोर असलेल्या वसाहतीमध्ये एक ट्रक उभा होता. दरम्यान, या ट्रकमधील, ६ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या कापडांच्या गठ्ठ्यांची चोरी झाली. ही घटना आज (सोमवारी) घडली.

ट्रकमधील २०८ गाठींपैकी ४८ गाठी चोरी-

बॅटको रोडलाईन कंपनीच्या दहा चाकी ट्रकवर बदनापूर तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी असलेला शेख अमीर शेख हमीद (वय २३) हा चालक म्हणून काम करतो. हा चालकाने ट्रकमध्ये हमदाबाद येथील बॅटको कंपनीतून विविध प्रकारच्या कच्च्या कपडयांच्या व रेडीमेड कपडयांच्या २०८ गठ्ठे वाहनात भरून निजामाबादकडे घेऊन जात होता. सोमवारी रात्र झाल्यामुळे व आराम करण्याच्या उद्देशाने वाहन बदनापूर तालुक्यातील वरूडी येथील नूर हॉस्पिटलसमोर चालकाने थांबवले. यावेळी अंदाजे रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या ट्रकमधील २०८ गठ्ठ्यांपैकी ४८ गठ्ठे चोरून नेले. या कापडयांच्या गठ्ठ्यांची किंमत सहा लाख पन्नास हजार रुपये एवढी होती.

पोलिसांत याबाबत तक्रार दाखल-

औरंगाबाद–जालना हायवेवर मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तरी देखील एवढया मोठया प्रमाणात उभ्या ट्रकमधील कापड गठ्ठे चोरून नेल्यामुळे वाहनचालकांत खळबळ उडाली आहे. याबाबत वाहनाचा चालक शेख अमीर याने बदनापूर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे हे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा- नाशिक : भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेच्या गळाला लागल्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details