जालना -कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या उत्तर प्रदेश सरकारला बरखास्त करावे आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी आज काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली.
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; जालन्यात काँग्रेसची मागणी - जालना सत्याग्रह आंदोलन
बलात्कार झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भेटायला गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तेथे धक्काबुक्की करण्यात आली. ही या सरकारची दडपशाही आहे. ही दडपशाही मोडीत काढून हे सरकार बरखास्त करावे आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
![उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; जालन्यात काँग्रेसची मागणी Impose presidential rule in uttar pradesh said Congress during satyagraha andolan in Jalna](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9061133-990-9061133-1601907117711.jpg)
मस्तगड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांच्यासह काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचीही उपस्थिती होती. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. ज्या तरुणीवर बलात्कार झाला त्या पीडित तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भेटायला गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनादेखील तेथे धक्काबुक्की करण्यात आली. आता अन्य नेतेमंडळीही ही या कुटुंबियांना भेटून सांत्वन करण्यासाठी जात आहेत; मात्र त्यांना अडवले जात आहे. ही या सरकारची दडपशाही आहे. ही दडपशाही मोडीत काढून हे सरकार बरखास्त करावे आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी केली.
या सत्याग्रह आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महमूद, भीमराव डोंगरे, आर. आर. खडके, विजय कामड, दिनकर घेवंदे, भोकरदनच्या नगराध्यक्ष सौ. मंजुषा देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, अलका झाल्टे आदींची उपस्थिती होती.