जालना- स्कुटीवरून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून दारूच्या बाटल्यांसह स्कूटी जप्त केली आहे. रामभाऊ चव्हाण (वय - 45 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो जालना येथीलरामनगरमधील सुवर्णकारनगर रहिवासी आहे.
स्कुटीवरून दारूची अवैध वाहतूक, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
स्कुटीवरून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून दारूच्या बाटल्यांसह स्कूटी जप्त केली आहे. रामभाऊ चव्हाण, असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा -२०५० मध्ये मुंबई बुडणार! वाचवायची असेल तर भुयारी मेट्रोचे काम थांबवा - गिरीष राऊत
पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या देविदास बबनराव जाधव या पोलीस कर्मचाऱ्याला आज(शुक्रवार) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नूतन वसाहत भागामध्ये संशयित व्यक्ती आढळला. त्याला थांबून चौकशी केली असता रामभाऊ चव्हाण, असे नाव त्याने सांगितले. त्यावरून त्याच्यासोबत असलेल्या स्कुटीवरील पिशव्यांची तपासणी केली असता चार पिशव्यांमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. यामध्ये मॅकडॉल, ब्लॅक डीएसपी अशा विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. सुमारे 25 हजार रुपयांच्या या दारूच्या बाटल्यांसह 40 हजार रुपयांची एनवायएक्स इलेक्ट्रिक स्कूटी पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.