महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळूचोरी, जेसीबीसह 40 लाखाचा मुद्देमाल जप्त - Action against illegal sand mining

अवैध वाळू उपसा करण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात. त्यांच्यावर कारवाई करणेही अवघड होते. मात्र केदारखेडा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या जेसीबीसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळूचोरी, जेसीबीसह 40 लाखाचा मुद्देमाल जप्त
केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळूचोरी, जेसीबीसह 40 लाखाचा मुद्देमाल जप्त

By

Published : Dec 10, 2020, 1:56 PM IST

जालना :भोकरदन तालुक्यातील केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून रात्रीच्यावेळी चोरटा वाळू उपसा सुरू असतो. यासंदर्भातील खात्रीलायक माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी काल गुरुवारी रात्री केदारखेडा जवखेडा ठोंबरेला जाणाऱ्या रस्त्यावर केदारखेडा शिवारातील पुर्णा नदीच्या पात्रातून विना क्रमांकाचा जेसीबी जप्त केला. तसेच हायवा वाहन क्रमांक MH-21-BH 9495 ही जप्त करण्यात आले. यासह एकूण चाळीस लाख चार हजार रुपये किंमतीच्या वाळूसह मुद्येमाल जप्त करण्यात आला. दोन्ही वाहनाचे चालक व मालक यांच्याविरुध्द पोलीस ठाणे भोकरदन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, स्थानिक गुन्हे शाखा जालना, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस नाईक गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, जगदीश बावणे, प्रशांत लोखंडे चालक पैठणे यांनी ही प्रत्यक्ष कारवाई केली.

हेही वाचा - जालन्यात रस्त्यालगतच्या घरात कंटेनर घुसला; दोन मुलींचा मृत्यूजालन्यात 66 हजार क्विंटल कापसाची खरेदी

ABOUT THE AUTHOR

...view details