जालना -बेकायदेशीर गुटखा वाहून नेणारा कंटेनर शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी पकडला आहे. यातून ३७ लाख ८० हजार रुपयांच्या गुटख्यासह २५ लाख रुपयांचे कंटेनर असा एकूण ६२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चार दिवसापूर्वी हा कंटेनर दिल्लीहून बंगळुरुमार्गे मदुराईकडे निघाला होता. कंटेनर शुक्रवारी जालना पोलिसांनी ताब्यात घेतला.
हेही वाचा - जामिनावर सुटून ३० घरफोडी करणारा 'मॉडेल' पोलिसांच्या जाळ्यात
कंटेनर (क्रमांक - आर जे १४ जीजे ८५५०) जालना जिल्ह्यातून जात असताना शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना माहिती मिळाली. या कंटेनरमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थापासून तयार केलेला गुटखा वाहून नेला जात आहे. या माहितीवरून सदरील कंटेनर हा बीड रोडवर असलेल्या बारसवाडा फाट्याजवळील राजस्थान ढाब्याजवळ अडवला. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. चालक अमीर खान माजिद खान (वय-३३) अमीर नगर ता. तीजारी जिल्हा अलवर (राजस्थान) येथील राहत आहे.