महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रसिद्धीपेक्षा काम करण्यावर भर देऊ, आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची ग्वाही - औरंगाबाद परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक के. मल्लिकार्जून प्रसन्ना न्यूज

औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के. मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी जालना जिल्ह्याचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी आम्ही प्रसिद्धीपेक्षा कामावर जास्त भर देणार असल्याचे सांगितले.

igp mallikarjuna prasanna visited jalna district
प्रसिद्धीपेक्षा काम करण्यावर भर देऊ, आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची ग्वाही

By

Published : Jan 2, 2021, 10:31 AM IST

जालना -औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के. मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी २०२० वर्षाअखेरीस जालना जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी, प्रसिद्धीपेक्षा कामावर भर देणार असल्याचे सांगितले.

मी आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख नव्यानेच बदलून आलो आहोत. आमचे काम सामान्य जनतेसाठी असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जनतेने आम्हाला थोडा वेळ द्यावा, त्यानंतर आमच्या कामाचे मूल्यमापन करावे, असे आवाहन प्रसन्ना यांनी या आढावा दौऱ्यानिमित्ताने केले.

जिल्ह्यातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची कुठे बदली करायची?, कोणाकडून काय काम करून घ्यायचे?, कसे काम करून घ्यायचे हे सर्व अधिकार पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांना आहेत. त्यामुळे त्यामध्ये आपण लक्ष देणार नाही. आपण फक्त सर्वांची कामे कशी होतील, एवढेच पाहणार असल्याचे देखील प्रसन्ना यांनी सांगितलं.

यावेळी प्रसन्ना यांच्यासोबत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक हसन यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -जालना नगरपालिकेच्या सहा समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड

हेही वाचा -भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details