महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर भोकरदनमधील 'त्या' मृत महिलेची ओळख पटली; मृत्यूचे गूढ मात्र कायम - भोकरदनमधील मृत महिलेची ओळख पटली

भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारातील शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घातपाताची शक्यता असल्याचे परिसरात बोलले जात होते. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली होती.

भोकरदनमधील मृत महिलेची ओळख पटली

By

Published : Nov 16, 2019, 8:47 AM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारातील शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घातपाताची शक्यता असल्याचे परिसरात बोलले जात होते. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली होती. याची नोंद भोकरदन पोलिसांनी घेवून तपास सुरू होता. आज(शनिवार) त्या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव पंचिफुला धनाजी करताडे (वय 45) असे आहे.

भोकरदनमधील मृत महिलेची ओळख पटली

हेही वाचा -मुख्यमंत्री सहायता कक्ष चालू करा, अन्यथा शिवसेना पद्धतीने चालू करू - उदय सामंत

भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील रामदास बजेबा गावंडे यांचे घारेवाडी शिवारात शेत असून ते कुटुंबासोबत शेतात काम करत होते. त्यांना कपाशीच्या शेतामध्ये कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. तसेच दुर्गंधीही येत होती. गावंडे यांनी कपाशीच्या शेतामध्ये जाऊन पाहिले असता, त्याठिकाणी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. त्यांनी गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी भोकरदन पोलिसांना कळवले. माहिती मिळताच भोकरदन पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, बिट जमादार नागरगोजे हे घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली.

शिवारातील शेतामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. महिलेचा मृतदेह सहा ते सात दिवसांपासून टाकल्याचा अंदाज वर्तवला जात होता. ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. कपाशीच्या शेतामध्ये कोणतेही झाडांची मोडतोड झालेली नव्हती. तसेच महिलेचा मृत्यू सात दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. तसेच चेहरा सुजल्याने ओळख पटत नव्हती. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून मृत महिला हरवली आहे, असा मेसेज फिरत होता. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटली असून, मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

दरम्यान, मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मृत महिलेचा मृत्यदेह औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तपासणी करण्यात येत आहे. तेथील रिपोर्ट आल्यानंतर घटनेचे खरे कारण समजू शकेल.

ABOUT THE AUTHOR

...view details