जालना- विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसच शिल्लक आहेत. या काळात विविध पक्षांच्या उमेदवारांकडून आपआपल्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करुन मते आपल्या पदरात ओढून घेण्याची खटपट सुरू आहे. विरोधकांना मोठ्या मताधिक्याने कसे पराभूत करावे यावर विविध पक्षातील उमेदवारांचे मंथन सुरू असताना विरोधक जिवंत नसून मला मतदारसंघात स्पर्धाच नसल्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोनीकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले आहे.
मतदारसंघात स्पर्धाच नाही, ३० वर्षात झाला नाही तो बदल मी ५ वर्षात केला - बबनराव लोणीकर - babanrao lonikar vidhansabha election news
विरोधकांना मोठ्या मताधिक्याने कसे पराभूत करावे यावर विविध पक्षातील उमेदवारांचे मंथन सुरू आहे. मात्र माझ्या मतदारसंघात विरोधक जिवंत नसून मला मतदारसंघात स्पर्धाच नसल्याचे मत पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोनीकर यांनी व्यक्त केले. 'ईटीव्ही भारत' शी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
![मतदारसंघात स्पर्धाच नाही, ३० वर्षात झाला नाही तो बदल मी ५ वर्षात केला - बबनराव लोणीकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4771833-thumbnail-3x2-op.jpg)
बबनराव लोणीकर
पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोनीकर यांच्याशी चर्चा करताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी
बबनराव लोणीकर यांची सविस्तर मुलाखत ऐका ईटीव्ही भारत वर...