जालना : जालना शहरातील सूतगिरणी कुंबेफळ शिवारातील दारूड्या पतीने माहेरी राहत असलेल्या पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृन खून ( husband cut wife throat ) केला. ही घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत महिलेचे नांव रमाबाई कदम रा. नुतनवाडी ता. जालना असे असून सदर मयत महिलेस 3 मुले आहेत.
Husband Killed Wife : माहेरी राहत असलेल्या पत्नीचा पतीने केला गळा कापून खून - husband killed wife
जालना शहरातील सूतगिरणी कुंबेफळ शिवारातील दारूड्या पतीने पत्नीचा खून केला आहे. पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृन खून ( husband cut wife throat ) केला. मयत महिलेस 3 मुले आहेत. पतीवर कलम 302 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे.
दारूच्या नशेत रमाला मारझोड :हत्येच्या खळबळजनक घटनेची माहिती अशी की, कुंभेफळ येथील भागाजी वैताळराव आचलखांब यांची मुलगी रमा हिचा विवाह काही वर्षापुर्वी नुतनवाडी येथील संदीप भीमराव कदम याच्यासोबत झाला. विवाहानंतर रमा हिस 3 मुले झाली. पैकी एक 3 महिन्याचा मुलगा आहे. दरम्यान संदीप कदम यास दारूचे व्यसन असल्यामुळे तो नेहमी दारूच्या नशेत रमाला मारझोड करीत ( Drunk husband beat wife ) होता. एक महिन्यापुर्वी संदीपने रमा हीस बेदम मारहाण केली. या दररोजच्या त्रासाला कंटाळून रमा हिने शिवारातील एका विहिरीत उडी घेवून, जीवन संपवण्याचा प्रयत्न केला ( husband killed wife ) होता.
जीवन संपवण्याचा प्रयत्न : दरम्यान ही घटना माहिती झाल्यानंतर माहेरच्या आचलखांब कुटूंबीयांनी रमाबाई व तिच्या तीन्ही मुलांना माहेरी कुंभेफळ येथे आणले होते. गेल्या 1 महिन्यापासून रमा व मुले कुंभेफळ येथे माहेरी राहत होते. दरम्यान 10 नोव्हेंबर रोजी सकाळी पती संदीप कदम याने मोबाईलवर फोन केला. कुंभेफळ येथे आला. त्यानंतर दुपारच्या सुमारास रमा ही घरात एकटी असल्याची संधी साधून त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून निर्घृन खून केला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले.याबाबत तालुका पोलिस ठाण्यात संदीप कदम रा. नुतनवाडी ता.जालना याच्याविरूध्द भादंवि तालुका पोलीस ठाण्यात कलम 302 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे.