जालना: जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील कृष्णा पंडित हा अंबड शहरात कॉम्प्युटर ऑपरेटरचा व्यवसाय करतो. तर त्यांची पत्नी मनीषा पंडित एका खासगी बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत कार्यरत आहे. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. भाडंणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या कृष्णा पंडित यांने पत्नी मनीषा हिला मारहाण करत तिच्या डोक्यावर विट फेकून मारली. मनीषाच्या डोक्यातून रक्त निघू लागल्याने तिने खाजगी रुग्णालय गाठले. विटेचा जोरदार फटका बसल्याने तिच्या डोक्यात सहा टाके पडले. शहागड येथील एका खाजगी रुग्णालयात तिने उपचार घेतले.
उंदीर मारण्याचे औषध दिले:मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास, कृष्णा पंडित त्याच्या मुली चिऊ उर्फ श्रेया आणि शिवाज्ञा या दोन्ही मुलींना शहागड येथील पैठण फाटयावरील पाहुण्याच्या वीट भट्टीवर घेऊन गेले. त्याने उंदीर मारण्याचे औषध स्वतः पिले आणि दोन्ही मुलींना देखील पाजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने तिघेही उलट्या करून बेशुद्ध झाल्याचे नातेवाईकांनी त्यांना तात्काळ प्रथम गेवराई व नतंर बीड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बुधवारी कृष्णा पंडित याची तब्येत बरी झाली. परंतु मुलींच्या तब्येतीत सुधारणा झालीच नाही.अखेर गुरुवारी सकाळी मोठी मुलगी श्रेयाची जीव गेला. तर दुसरी मुलगी शिवाज्ञा हिची तब्येत अजून गंभीर असल्याचे समजते.