महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रतिदिन साडेचार हजारांच्या पुढे रुग्णालयाला खर्च आकारता येणार नाही - आरोग्यमंत्री - rajesh tope on ppe kit

कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठा संदर्भात बोलताना टोपे म्हणाले की, ऑक्सिजन हा कोरोनाबाधित रुग्णासाठी महत्त्वाचा घटक आहे. आणि सध्या तो मनुष्यबळाकडून हाताळण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्यावेळी या सिलेंडरचे बटन चालू राहिले किंवा सिलेंडरमधील ऑक्सिजन संपत आल्यानंतर रुग्णाला त्याचा पुरवठा कमी होतो.

hospital-will-not-be-able-to-charge-more-than-4500-per-day-says-rajesh-tope
आरोग्यमंत्री

By

Published : Jul 27, 2020, 7:34 PM IST

प्रतिदिन साडेचार हजारांच्या पुढे रुग्णालयाला खर्च आकारता येणार नाही - आरोग्यमंत्री

जालना- महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांना शासनाच्या माध्यमातून पीपीई किट पुरविल्या जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णाने हा खर्च हॉस्पिटलला देऊ नये, हॉस्पिटलच्या खर्चावर सरकारने निर्बंध आणले आहेत. एखादा रुग्ण जर दिवसभर रुग्णालयात भरती असेल तर जास्तीत जास्त प्रतिदिन साडेचार हजारांच्यापुढे रुग्णालयाला खर्च आकारता येणार नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ते आज जालना येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

आरोग्यमंत्री

राज्यशासन हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही संस्थात्मक विलगिकनातून वाढत आहे. त्यामुळे या आजाराचा सामूहिक संसर्ग आहे, असे म्हणता येणार नाही. खाजगी रुग्णालय पीपीई किटच्या माध्यमातून प्रत्येक वेळी दीड हजार रुपये काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्ण जर 10 दिवस रुग्णालयात राहिला तर त्याला 15 हजार रुपये भुर्दंड भरावा लागतो.


कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठा संदर्भात बोलताना टोपे म्हणाले की, ऑक्सिजन हा कोरोनाबाधित रुग्णासाठी महत्त्वाचा घटक आहे. आणि सध्या तो मनुष्यबळाकडून हाताळण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्यावेळी या सिलेंडरचे बटन चालू राहिले किंवा सिलेंडरमधील ऑक्सिजन संपत आल्यानंतर रुग्णाला त्याचा पुरवठा कमी होतो. आणि पर्यायाने दुर्घटना होऊ शकते. असे होऊ नये म्हणून लिक्विड ऑक्सिजन सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यासाठी 40 ते 50 लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. त्याचे काम सध्या जालना येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात याची सुरुवात करण्यात आली आहे. अशाच प्रकारची ही उपायोजना राज्यभरात सुरू करावी यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्रव्यवहार केला जाणार आहे.


दरम्यान, राजेश टोपे यांनी आज जालना शहरात काम करत असलेल्या सेवाभावी संस्था आणि उद्योजकांची सकाळी बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेतली.

मुख्यंत्र्यांची भूमिका योग्यच...

मातोश्रीत एक मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सुपर मुख्यमंत्री असल्याची टीका होत आहे. या प्रश्नावर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, मुख्यमंत्री हे घरात बसून आहेत. मात्र जिथे गरज आहे तिथे ते तत्परतेने लक्ष देत आहेत. आम्ही फ्रंटवर काम करत आहोत, मुख्यंत्र्यांची भूमिका योग्यच आहे.

जालना दौऱ्यावर असलेले आरोग्य मंत्री टोपे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी राज्यात तीन मुख्यमंत्री असल्याची टीका केली आहे. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य मंत्री म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील सर्व मीटिंगसाठी हजर राहात आहेत. ते घरात असले तरी प्रत्येक आठवड्याला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागातील अधिकारी, आणि मंत्र्यांसोबतही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत असतात आणि माहिती घेऊन योग्य सूचना देतात. फ्रंटवर जाऊन आम्ही मंत्री काम करत आहोत. त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्यच आहे, असेही टोपे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details