महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भौतिक शत्रूला मारण्यासाठी हिंदुंनी घरात शस्त्रे ठेवावीत - अनिल ओक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जालना

जालन्यात विजयादशमी निमित्त रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमादरम्यान बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिल ओक यांनी भौतिक शत्रूला मारण्यासाठी शास्त्र उपयोगाचे नाही तर तिथे शस्त्रच लागते आणि अशा शस्त्रांमुळे आशीर्वादाला ताकद मिळते. त्यामुळे हिंदुंनी आपल्या घरात ज्याची जशी क्षमता असेल तशी शस्त्रे ठेवावीत आणि त्याचे पूजन करावे असे आवाहन केले.

आरएसएस आयोजित विजयादशमी कार्यक्रमात बोलताना अनिल ओक

By

Published : Oct 7, 2019, 11:23 AM IST

जालना - महिलांनी देखील युद्धात पारंगत असावे, म्हणून विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो. हा शक्ती पूजेचा उत्सव आहे. प्रत्येक देवीच्या हातात शस्त्र आहे याचाच अर्थ शास्त्र टिकवण्यासाठी शस्त्र असेल तरच ते शक्य आहे अन्यथा शास्त्रांना काहीच अर्थ नाही. भौतिक शत्रूला मारण्यासाठी शास्त्र उपयोगाचे नाही तर तिथे शस्त्रच लागते आणि अशा शस्त्रांमुळे आशीर्वादाला ताकद मिळते. त्यामुळे हिंदूंनी आपल्या घरात ज्याची जशी क्षमता असेल तशी शस्त्रे ठेवावीत आणि त्याचे पूजन करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उज्जैन येथील आणि 2015 पासून नागपूर येथे अखिल भारतीय सहप्रमुख या पदाची जबाबदारी असलेल्या अनिल ओक यांनी केले.

आरएसएस आयोजित विजयादशमी कार्यक्रमात बोलताना अनिल ओक

रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलन आणि आणि शस्त्र पूजन समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रा.स्व. संघाचे जालना जिल्हा संघचालक सुनिल बनारसीदास गोयल, शहर संघचालक नितीन बद्रीनारायण आणि प्रमुख पाहुणे म्हणून मैत्र मांदियाळीचे कार्यकर्ते अजय किंगरे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - भोकरदन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने

यावेळी बोलताना नितीन ओक म्हणाले की, देशात परिवर्तन पाहिजे असेल तर आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. आज देशाच्या सैन्याला पाकिस्तानसोबत लढण्याची भीती नाही. त्यांना चिंता आहे ती देशांतर्गत असलेल्या गद्दारांची. अशावेळी या सैन्याने सीमेवर लढावे का देशांतर्गत गद्दारांशी लढावे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्ही सीमेवर लढा देशांतर्गत गद्दारांची आम्ही लढू, असा विश्वास आपण सैन्याला दिला पाहिजे. या गद्दारांशी लढण्यासाठी हिंदूंनी घरात शस्त्रे ठेवावीत. तसेच संघ शाखेमध्ये पूजा विधी, देव-देवतांचे कार्यक्रम शिकविल्या जात नाहीत. तर, देशासाठी श्रद्धा, समर्पण काय असते हे शिकवले जाते. अशावेळी हिंदू कोणत्या देव-देवतेची पूजा करतो याला महत्त्व न देता तो भारतमातेला मानतो आहे याच्यावर भर दिला जातो. स्वतःसाठी तर कोणीही जगेल परंतु दुसऱ्यासाठी जगणे आणि आपले आयुष्य समर्पण करणे हे संघाच्या शाखेतून शिकविले जाते. या शाखेत तयार झालेला माणूस काय करू शकतो? याची कल्पना देखील आपण करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - साडेतीन पीठाच्या शक्तीचे वास्तव्य म्हणजे अंबडची 'मत्स्योदरी देवी'

या शस्त्रपूजन कार्यक्रमापूर्वी शहरातून पथसंचलन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या वेळी देखील स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमाला शहरातील मान्यवर मंडळींमध्ये भास्करराव दानवे, उद्योजक घनश्यामजी गोयल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, डॉक्टर विजय आराध्ये, यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details