महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंदूंसाठी कायदे आणि अल्पसंख्याकांसाठी फायदे, हिंदू जनजागृती समितीचा आरोप - हिंदू जनजागृती समितीचा आरोप

देशामध्ये हिंदूंसाठी कायदे केले जातात आणि अल्पसंख्याकांना फायदे दिले जातात, असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केला.

Hindu Janajagruti Samiti comment on hindu religion
सुनील घनवट

By

Published : Feb 8, 2020, 7:30 PM IST

Updated : Feb 8, 2020, 8:05 PM IST

जालना - या देशामध्ये हिंदूंसाठी कायदे केले जातात आणि अल्पसंख्याकांना फायदे दिले जातात, असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केला. हिंदू जनजागरण समितीच्या वतीने उद्या (९ फेब्रुवारी) हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते.

हिंदू जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र संघटक सुनील घनवट

हेही वाचा - ‘आधी लगीन मतदानाचे’ नवरदेव शेरवानीत पोहोचला मतदान केंद्रावर

हेही वाचा - कर्नाटक: उसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावरून कोसळला; ६ जणांचा मृत्यू


उद्या होणाऱ्या सभेची माहिती देताना ही सभा कोणत्याही जाती धर्माशी निगडीत नाही आणि कोणाचाही द्वेष करत नाही. मात्र, ज्या पद्धतीने अन्य समाजाला सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या पद्धतीनेच हिंदू धर्मियांना देखील सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्य धर्मीयांचे त्यांच्या प्रार्थना स्थळांसाठी वेगवेगळे मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत. मात्र, हिंदू धर्मियांच्या मंदिरावर सरकारचे नियंत्रण का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 8, 2020, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details