जालना - जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. भोकरदन, जाफ्राबाद या तालुक्यासह घनसावंगी तालुक्यात पाऊस झाला. गेल्या 4 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील मांदळा लघु प्रकल्प ओव्हर प्लो झाला आहे. यामुळे प्रकल्प क्षेत्रांत येणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. तर दुसरीकडे लिंगेवाडीत भरपावसात विजेचा धक्का लागल्यामुळे दोन भावाचा मृत्यू झाला आहे.
जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर विजेच्या धक्क्यामुळे दोन भावांचा मृत्यू - लिंगेवाडी
मुसळधार पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील मांदळा लघु प्रकल्प ओव्हर प्लो झाला आहे. यामुळे प्रकल्प क्षेत्रांत येणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. तर दुसरीकडे लिंगेवाडीत भरपावसात विजेचा धक्का लागल्यामुळे दोन भावाचा मृत्यू झाला आहे.
भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथे आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास दोन सख्या चुलत भावांचा जनावरांना कुट्टीच्या साहायाने चारा कापताना विजेचा जोराचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पवन गजानन घोडे (२२) व सचिन रामकीसन घोडे (२२) अशी दोघांची नावे आहेत. पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. पाऊस सुरू असल्याने जनावरांना बाहेर चरण्यासाठी सोडणे शक्य नव्हते. चारा घेण्याच्या उद्देशाने गेलेल्या दोघा भावांचा विजेच्या धक्का लागला. शेजाऱ्यांनी आरडा-ओरडा करत दोघांना तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघांवरही ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर
उशीरा लिंगेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा -मुखेड तालुक्यात कारसह पितापुत्र गेले वाहून; पाहा व्हिडिओ