जालना - भोकरदन तालुक्यासह शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. भोकरदन परिसरात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस
18 फेब्रुवारी रोजी पावणे तीन वाजेदरम्यान मुसळधार पावसासह गारपीट झाली. यात सोंगणीसाठी आलेले गहू, बाजरी,हरबरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्याने शेतकरी मेटकुटीस आला आहे.
18 फेब्रुवारी रोजी पावणे तीन वाजेदरम्यान मुसळधार पावसासह गारपीट झाली. यात सोंगणीसाठी आलेले गहू, बाजरी,हरबरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्याने शेतकरी मेटकुटीस आला आहे. भोकरदन परिसरातील मालखेडा, पेरजापूर, इब्राहिमपूर, परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपीटीमुळे गहू, ज्वारी, हरबरा या पिकांना मोठा फटका बसला आहे.शेतकरी ओला दुष्काळ व कोरोना काळातून सावरत असताना आता पुन्हा निसर्गाने दगा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -अभिनेत्यांबद्दल बोललं की आपसूकच प्रसिद्धी मिळते; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोले यांना टोला