महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात पावसाचा हाहाकार; झेंडू फूल विक्रेत्यांंना फटका

शहरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आणलेली झेंडूची फुले वाहून गेली. जी फुले राहिली ती देखील पाण्याने सडून गेली. पावसामुळे शेतकऱ्यांची हाती असलेले पिक देखील गेले आहे.

जालन्यात पावसाचा हाहाकार

By

Published : Oct 26, 2019, 9:43 PM IST

जालना- शहरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आणलेली झेंडूची फुले वाहून गेली. जी फुले राहिली ती देखील पाण्याने सडून गेली. पावसामुळे शेतकऱ्यांची हाती असलेले पीक देखील गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.

जालन्यात पावसाचा हाहाकार

गेल्या दहा दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरी सुटला असला तरी, कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिकांना पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात आठ दिवसापूर्वी चांगला पाऊस पडला. त्यामुळे झेंडूच्या फुलांचे चांगले उत्पादन झाले होते. तसेच, लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना मान आहे. दुकाने सजवण्यासाठी, घरांना सजवण्यासाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची खरेदी केली जाते. यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो.

मात्र, आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचा फूल मालाला जबर नुकसान झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर मांडलेली दुकाने वाहून गेलीत. उघड्यावर मांडलेली फुले पावसाच्या पाण्याने सडून गेलीत. त्यामुळे ग्राहकांनी देखील ओल्या फुलांकडे पाठ फिरविली आहे. एकंदरीत यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हेही वाचा-जालन्यात परतीच्या पावसाचे थैमान; मका, कापूस पिकांचे नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details