महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना : घनसावंगीत जोरदार पाऊस, १४ गावांचा संपर्क तुटला - घनसांगवीत जोरदार पाऊस

घनसावंगी तालुक्यातील राजेगाव परीसरात तब्बल दोन तास पाऊस झाला. या जोरदार पावसाने घनसावंगी राजेगाव रोडवरील मोठ्या नाल्याला पूर आला. यामुळे जवळपास 14 गावांचा दोन तासापासून संपर्क तुटला.

jalna
jalna

By

Published : Aug 18, 2021, 4:55 AM IST

जालना - गेल्या महिन्याभराच्या विश्रांतीनंतर जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, जालना, घनसावंगी तालुक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील राजेगाव परीसरात तब्बल दोन तास पाऊस झाला. या जोरदार पावसाने घनसांगवी राजेगाव रोडवरील मोठ्या नाल्याला पूर आला. पुलावरून पाणी वाहिले. यामुळे जवळपास 14 गावांचा दोन तास संपर्क तुटला. नाल्याला पूर आल्याने अनेकजणांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली.

घनसावंगीत जोरदार पाऊस, १४ गावांचा संपर्क तुटला

ABOUT THE AUTHOR

...view details