जालना - पावसाने वेळेत हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, जिल्ह्यातील अंबड तालुक्यात चार दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाला. त्यामुळे पेरलेले बियाणे वाहून गेले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
पेरणी केली, पाऊस आला अन् बियाणे वाहून गेले... - जालना पाऊस बातमी
अंबड तालुक्यातील अंतरवाला, शिराढोण, देशगव्हाण, आमलमगाव, हस्त पोखरी तर बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव, सायगाव, नानेगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याने पेरलेले बियाणे पावसाने खरडून नेले.
यंदा मान्सून वेळेत दाखल झाला. पावसाने दमदार एन्ट्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. जमिनीत ओलावा येताच शेतकऱ्याने पेरणीला सुरुवात केली. काहींचे पीक सुद्धा जमिनीवर डोकावत होते. मात्र, १७ जूनला बदनापूर आणि अंबड तालुक्यात अतिवृष्टी झाली. जवळपास चार तास मुसळधार पाऊस कोसळत होता. अंबड तालुक्यातील अंतरवाला, शिराढोण, देशगव्हाण, आमलमगाव, हस्त पोखरी, तर बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव, सायगाव, नानेगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याने पेरलेले बियाणे पावसाने खरडून नेले.
ज्या शेतातील बियाणे वाहून गेले, ते दुबार पेरणीच्या तयारीला लागले आहेत, तर काही शेतांमध्ये अद्यापही पाणी साचले आहे. शेतकरी पाणी जिरण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतर शेती पेरणीयोग्य झाल्यावर दुबार पेरणी केली जाईल. या दोन्ही तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.