महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात उष्णतेची लाट; फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याने केली शक्कल - jalna live news

जालना जिल्ह्यातील तापमान 41 ते 42 डिग्री सेल्सिअसवर गेल्याने फळबागांना वाढत्या उन्हाचा फटका ( Heat waves in jalna ) बसू लागला आहे. उन्हामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खालवत चालली आहे. कमी पाण्यात फळ बाग टिकवण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्न करत ( Farmers struggled to save orchards ) आहेत. सध्या उन्हाळ्याने सर्वांची दाहकता वाढवली आहे. आपली बाग कशी वाचवायची यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. अशाच एका गोंदेगाव येथील मोसंबीच्या बागेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया.

Heat waves in jalna
जालन्यात उष्णतेची लाट; फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याने केली शक्कल

By

Published : Apr 5, 2022, 5:12 PM IST

जालना - जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील तापमान 41 ते 42 डिग्री सेल्सिअसवर गेल्याने फळबागांना वाढत्या उन्हाचा फटका ( Heat waves in jalna ) बसू लागला आहे. उन्हामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खालवत चालली आहे. कमी पाण्यात फळ बाग टिकवण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्न करत ( Farmers struggled to save orchards ) आहेत. सध्या उन्हाळ्याने सर्वांची दाहकता वाढवली आहे. आपली बाग कशी वाचवायची यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. अशाच एका गोंदेगाव येथील मोसंबीच्या बागेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया.

जालन्यात उष्णतेची लाट; फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याने केली शक्कल

शेतकऱ्याने केली शक्कल - विहिरीचे पाणी ड्रीपच्या साह्याने सध्या एकच तास चालेले ऐवढेच आहे. फळबागांना पाणी कमी पडू नये म्हणून म्हणून शेतकऱ्यांनी आता शक्कल लढवण्यात सुरुवात केली आहे. सोयाबीन, गहू, मका पिकाच्या भुसा वापरून झाडाच्या खोडाजवळ मल्चिंग केले आहे. फळबागेतील झाडाच्या खोडाजवळ भुशाची मल्चिंग केल्यामुळे बागेला दिलेल्या पाण्याचा ओलावा टिकून राहतो तसेच पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही मंदावतो. या पद्धतीमुळे सध्या शेतकऱ्याच्या बागेतील झाडांना नवीन पालवी फुटलेली आहे व सर्व झाडे हिरवेगार झालेली आहेत.

हेही वाचा -Sanjay Raut Property Seize By ED : शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात ईडीची मोठी कारवाई; ११.१५ कोटींची मालमत्ता जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details