जालना- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (शनिवार) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनाही यावेळी त्यांनी सूचना केल्या.
कोरोनाविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी घेतला जालना जिल्ह्याचा आढावा - corona virus india
जालना शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? सॅनिटायझर, मास्क यासोबत जिल्ह्यामध्ये स्वच्छतेविषयी नगरपालिका आणि जिल्हा परिषद काय उपाययोजना करत आहे, याचा राजेश टोपेंनी आढावा घेतला.
जालना शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? सॅनिटायझर, मास्क यासोबत जिल्ह्यामध्ये स्वच्छतेविषयी नगरपालिका आणि जिल्हा परिषद काय उपाययोजना करत आहे. याचा त्यांनी आढावा घेतला.
जालना शहर व जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्यावतीने औषधाची फवारणी केली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड आदि उपस्थित होते.