जालना - कर्नाटकनंतर आता महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. सध्या या रुग्णावर उपचार सुरू असून त्याची तब्बेत चांगली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
डोंबिवलीतील ओमायक्रॉन बाधिताची प्रकृती चांगली, रुग्णाने लसीकरण केले नव्हते - आरोग्य मंत्री राजेश टोपे - राजेश टोपे जालना प्रतिक्रिया ओमायक्रॉन रुग्ण
कर्नाटकनंतर आता महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. सध्या या रुग्णावर उपचार सुरू असून त्याची तब्बेत चांगली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्णात सौम्य लक्षने असून त्याने कोणतेही लसीकरण केलेले नव्हते, ही बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, असेही टोपे म्हणाले. या रुग्णाच्या संपर्कातील 12 नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात आले असून 23 संपर्कातील व्यक्तींचे देखील स्वॅब घेण्यात आले आहेत. तसेच, दिल्लीतून ते मुंबईत आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचे देखील स्वाब घेण्यात आले असून, हे सर्व कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई विमानतळावर आतापर्यंत 3 हजार 837 जणांचे स्वॅब घेतले असून यापैकी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या 28 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. डब्ल्यूएचओ या संदर्भात अभ्यास करत असून आयसीएमआर या संदर्भात जो निर्णय घेईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही टोपे म्हणाले. ओमायक्रॉनला घाबरण्याचे कारण नसून नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील टोपे यांनी केले.
हेही वाचा -Restrictions after omicron: केंद्र सरकार ठरवेल त्याप्रमाणे राज्यात निर्बंध लागू होतील - राजेश टोपे