महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rajesh Tope on Omicron : '12 वर्षावरील मुलांना लसीकरणाची गरज' - राजेश टोपे - Positive patient Found in Karnataka

ओमायक्रॉनचा संसर्ग (Omicron Variant) होण्याची गती जास्त आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांना अनुभव आल्याने ओमायक्रॉनची दहशत वाटणं साहजिक आहे. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह (Positive patient Found in Karnataka) आढळून आले आहे.

Rajesh Tope
Rajesh Tope

By

Published : Dec 4, 2021, 8:40 PM IST

जालना -ओमायक्रॉनचा संसर्ग (Omicron Variant) होण्याची गती जास्त आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांना अनुभव आल्याने ओमायक्रॉनची दहशत वाटणं साहजिक आहे. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह (Positive patient Found in Karnataka) आढळून आले आहे. त्यामुळे संसर्गाची भीती वाटते. मात्र, आपण जर काळजी नाही घेतली तर, तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते जालन्यात बोलत होते.

राजेश टोपेंची प्रतिक्रीया
कर्नाटकात आतापर्यंत फक्त दोनच रुग्ण ओमिओक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले असून सध्या राज्यात निर्बंध किंवा लॉकडाऊन लावला जाणार नाही .निर्बंध लावले तर लोकांना ते त्रासदायक ठरतील असेही ते म्हणाले. विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

12 वर्षावरील मुलांचे लसीकरण
12 वर्षावरील मुलांना लसीकरण केलं पाहिजे अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. केंद्राने याबाबतीत लवकर निर्णय घ्यावा. 5 वर्षाखालील मुलांना ओमायक्रॉनचा अधिक धोका आहे असं दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेसच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे यावर देखील टोपे यांनी भाष्य केले. कोरोनाच्या दोन्ही लाटेत मुलांना जरी कोरोनाची लागण झाली तरी त्यांची प्रकृती फार चिंताजनक नाही. मात्र, लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 12 वर्षांवरील मुलांना लसीकरण केलं पाहिजे असंही ते म्हणाले. लहान मुलांच्या टास्क फोर्सनं लसीकरणाची मागणी केंद्राच्या आरोग्य विभागाकडे केली आहे. राज्यातील ऑक्सीजन उत्पादकांना सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचे टोपे म्हणाले.

85 टक्के नागरिकांना पहिला डोस
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे.लहान मुलांना काय आवश्यक असेल त्याचाही आढावा घेऊन तयारी केली आहे.पण ही लाट येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 85 टक्के पहिला तर 45-46 टक्के दुसरा डोस नागरीकांना दिलेला आहे.त्यामुळे दुसरा डोस नागरिकांनी तातडीने घ्यावा टाळाटाळ करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हेही वाचा -Omicron Symptoms and Precautions : ओमायक्राॅन महाराष्ट्रात, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

ABOUT THE AUTHOR

...view details