महाराष्ट्र

maharashtra

बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये शाळा चालू करण्याबाबत चर्चा होणार - राजेश टोपे

By

Published : Jan 17, 2022, 10:36 PM IST

Updated : Jan 17, 2022, 10:55 PM IST

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, की लसीकरणाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. लसीकरणाची सक्ती ( Rajesh Tope on corona vaccination ) नाही. तर ऐच्छिक आहे. संपूर्ण लसीकरण करून घेण्याची राज्याची तयारी ( Maharashtra gov ready to complete vaccination ) आहे.

राजेश टोपे
राजेश टोपे

जालना- शाळांबाबत बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी माहिती दिली आहेत. शाळा सुरू करण्याबाबात स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते..

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, की लसीकरणाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. लसीकरणाची सक्ती ( Rajesh Tope on corona vaccination ) नाही. तर ऐच्छिक आहे. संपूर्ण लसीकरण करून घेण्याची राज्याची तयारी ( Maharashtra gov ready to complete vaccination ) आहे.

संपूर्ण लसीकरण करून घेण्याची राज्याची तयारी


हेही वाचा-Maharashtra Corona : घाबरू नका! फक्त 14 टक्केच लोकं रूग्णालयात; तर 0.32 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर -टोपे

लसीकरण करून घ्या-राजेश टोपे-

जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीत, त्याठिकाणी शाळा सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही शाळा सुरू करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे येत्या बुधवारच्या कॅबिनेटमध्ये शाळेबाबत चर्चा होणार ( MH Cabinet discussion on school reopen ) आहे. स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे. यासोबतच लसीकरण हे सक्तीचे नाही. ते ऐच्छिक आहे. लसीकरण करून घ्या, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

हेही वाचा-Rajesh Tope Letter To PM : लहान मुलं, वयोवृद्धांसाठी महाराष्ट्रात लसींची टंचाई.. पुरवठा करा, आरोग्यमंत्र्यांची मागणी

15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील शाळा व महाविद्यालय बंद

राज्यात कोरोना बाधिताची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Schools Closed in Maharashtra ) यामुळे विद्यार्थ्यांना परत 'ऑनलाइन'च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. ( Online Education in Maharashtra ) या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण ( Marathwada Graduates Constituency MLA Satish Chavan ) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याकडे नुकतेच केली आहे.

MLA Satish Chavan Letter to CM Thackeray : शाळा बंदबाबत फेरविचार करा, राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated : Jan 17, 2022, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details