जालना -राज्यातील 40 टक्के महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असल्याचा सर्वे एका खासगी कंपनीने केलेला आहे. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील झालेल्या बचतीतून विभागीय पातळीवर कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन असून असे हॉस्पिटल उभारले गेल्यास कॅन्सरच्या रुग्णांना आधार मिळेल. तसेच याबाबत जनजागृती सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून कँन्सर बद्दल जनजागृती सुरु आहे - राजेश टोपे - जालना राजेश टोपे
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील झालेल्या बचतीतून विभागीय पातळीवर कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन असून याबाबत जनजागृती सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महिलांना होणारा कॅन्सर बरोबर पुरुषांनादेखील ओरल कॅन्सरचा धोका अधिक असून याबद्दल देखील जनजागृतीची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणले. आज आरोग्य विभागाच्या गट क साठी परीक्षा पार पडतात आहे. या परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. न्यासा संस्थेशी योग्य समन्वय साधून परीक्षा चांगल्या प्रकारे पार पडाव्यात याबाबत योग्य नियोजन केल्याचे देखील टोपे यांनी म्हटले. 31 तारखेला पार पडणाऱ्या परीक्षार्थींसाठीदेखील आरोग्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.