जालना-कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच गुटखा विक्रीवर बंदी आहे. मात्र, गुटख्याची अवैध वाहतूक, विक्री होत आहे. कर्नाटकातून मलकापूरकडे जाणारा गुटख्याचा ट्रक हसनाबाद पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत गुटखा आणि ट्रकसह 65 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कर्नाटकातून मलकापूरकडे जाणारा गुटख्याचा ट्रक पकडला, 65 लाखांचा मुद्देमाल जप्त - jalna latest news
हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.एन. शेळके कर्मचाऱ्यासह एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. यादरम्यान त्यांना जालना ते भोकरदन रोडवर तपोवन पाटीजवळ एक संशयित ट्रक भरधाव वेगाने जाताना दिसला.

हेही वाचा-औरंगाबाद : देवगाव रंगारी येथील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण
हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.एन. शेळके कर्मचाऱ्यांसह एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. यादरम्यान त्यांना जालना ते भोकरदन रोडवर तपोवन पाटीजवळ एक संशयित ट्रक भरधाव वेगाने जाताना दिसला. पाठलाग करुन राजूरजवळ मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी ट्रक पकडला. ट्रकच्या चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, कर्नाटकातील गुलबर्गा येथून गुटखा घेवून बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर येथे जात असल्याचे सांगितले. संबंधित ट्रकमध्ये 50 गोण्या गुटखा होता. पोलिसांनी गुटख्यासह ट्रकही जप्त केला आहे. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एन शेळके यांनी सहकाऱ्यांसह ही कारवाई केली.