महाराष्ट्र

maharashtra

जालन्यात मराठा तरुणांचे केंद्र व राज्य सरकारविरोधात अर्धनग्न आंदोलन

By

Published : May 5, 2021, 11:36 PM IST

Updated : May 5, 2021, 11:53 PM IST

सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्याबद्दल जालन्यात मराठा समाजाच्या तरुणांनी अर्धनग्न आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नोटीस बजावून सोडून दिले.

agitation-of-maratha-youth
agitation-of-maratha-youth

जालना -सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्याबद्दल जालन्यात मराठा समाजाच्या तरुणांनी अर्धनग्न आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नोटीस बजावून सोडून दिले आहे.

जालन्यात मराठा तरुणांचे आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सकाळी 11 वाजता हाती आल्यानंतर मराठा समाजातील काही तरुण जुन्या जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले आणि केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देऊन अर्धनग्न आंदोलन केले. याच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खीरडकर आणि त्यांचा ताफा आंदोलनाच्या ठिकाणी हजर झाला आणि घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. कदीम जालना पोलीस ठाण्यात त्यांची रवानगी केली. दरम्यान अशोक पडुळ, संतोष गाजरे, विवेक देशमुख, विजय वाडेकर, यांच्यासह अन्य काही आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजावून सोडूनही देण्यात आले आहे.
Last Updated : May 5, 2021, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details