जालना -औद्योगिक वसाहतीमध्ये स्टील उत्पादन करणारे अनेक कारखाने आहेत. या मुख्य उद्योगासह खाद्यतेलाचे आणि अन्यदेखील कारखाने आहेत. मात्र, इथे मोठ्या प्रमाणात राज्य शासनाचा कर (जीएसटी) चुकविला जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना-औरंगाबाद महामार्गावर तंबू ठोकला आहे. तसेच वाहनांची कसून चौकशी सुरू आहे.
राज्यकर सहआयुक्त कार्यालयाची कारवाई -
औरंगाबाद विभागात येणाऱ्या राज्यकर सहआयुक्त कार्यालयाच्यावतीने ही कारवाई करण्यात येत आहे. जालन्यापासून काही अंतरावर असलेल्या पथकर नाक्याच्या बाजूलाच या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तंबू ठोकला आहे. नाक्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होत आहे. 29 तारखेपासून या तपासणीला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 10 हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
पंचवीस लाखांचा दंड वसूल -
राज्य शासनाच्या जीएसटी नियमानुसार ज्याने माल विकला आहे किंवा ज्याने माल खरेदी केला आहे, त्याने हे ई-वे बील फाडल्यानंतर संबंधित वाहनातून त्या मुदतीत माल नियोजित ठिकाणी पोहोचवणे अपेक्षित असते. मात्र, अनेक वेळा एक बील फाडल्यानंतर काही वाहने त्याच बिलाच्या आधारावर दोन चकरा मारून कर उडविण्याचा प्रयत्न करतात. तर अनेक व्यापारी हे बील फाडतच नाहीत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडत असल्याच्या तक्रारी या विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने या विभागाने इथे तंबू ठोकून वाहनांची तपासणीसुरू केली आणि सुमारे 35 वाहनांकडून 25 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दहा अधिकारी ठाण मांडून -