जालना (बदनापूर) - कोरोना रोगाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले असतानाच ग्रामीण भागातील प्रशासनही कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील ढासला पीरवाडी ग्रामपंचायतनेही अनेक उपाययोजना करून गावात कोणी येऊ नये व गावातून बाहेर जाऊ नये म्हणून कोरोना कालावधीसाठी थेट एका निवृत्त सैनिकाची (आर्मी जवान) नियुक्ती केली.
कोरोनामुक्तीसाठी ग्राम पंचायतने ठेवला सुरक्षा रक्षक - जालना ( बदनापूर )
कोरोना रोगाचा मुकाबाला करण्यासाठी पीरवाडी ग्रामपंचायतने अनेक उपाययोजना करीत गावात कोणी अनोळखी येऊ नये व गावातून बाहेर जावू नये म्हणून कोरोना थेट एका निवृत्त सैनिक (आर्मी जवान)ची नियुक्ती केली आहे.
बदनापूर तालुक्यातील ढासला पीरवाडी या ग्रुप ग्रामपंचायतने कोरोना मुक्तीसाठी विविध उपाययोजना केलेली असून गाव निर्जुतुकीकरण करण्यासाठी सायप्रोथिनची फवारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थांना व शेतवस्तीवरील नागरिकांना 2000 मास्क व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. एवढयावरच न थांबता या ग्रामपंचायतने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू आणणे वगळता इतर कोणत्याही कारणास्तव ग्रामस्थांना गाव न सोडण्याचा सल्ला दिला.
तसेच नवीन कोणालाही आरोग्य तपासणीशिवाय गावात येऊ न देण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी या 14 एप्रिलपर्यंत गावातील निवृत्त लष्करी जवान रंगनाथ चंद्रभान खरात यांची नियुक्तीच सुरक्षा रक्षक म्हणून केलेली असून त्यांच्याद्वारे गावातील कुणीही बाहेर जाऊ नये तसेच बाहेरील कुणी गावात येऊ नये याकडे लक्ष दिले जात आहे. यासाठी सरपंच राम पाटील, उपसरपंच शेख कादिर, अशोक नाईक आदी गावावर लक्ष ठेऊन आहेत.