जालना - राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जालना जिल्हा शाखेने आज देशव्यापी संप पुकारला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, मागणीसाठी जालन्यात कर्मचाऱ्यांचा संप - कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जालना जिल्हा शाखेने आज देशव्यापी संप पुकारला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
2005 नंतर नियुक्त झालेले कर्मचारी, शिक्षक आग्रही आहेत. परंतू, शासनाने अद्यापपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही. तसेच अनुकंपा तत्त्वावरील मृत कर्मचाऱ्यांचे वारस शासन दरबारी चकरा मारत आहेत. परंतू, या जागादेखील भरलेल्या नाहीत. या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या संपामध्ये महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश कावळे, चंदनशिवे संजय, गणेश कुलकर्णी एन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
TAGGED:
Old pension issue