जालना -शहागडजवळ राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी 52 लाख रुपयांचा अवैध गुटखा पकडला. गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली. 204 गोण्यांमधून हा गुटखा बीडवरून औरंगाबादला नेला जात होता.
शहागडजवळ ५२ लाखांचा गुटखा जप्त; गोंदी पोलिसांची कारवाई - शहागड गुटखा न्यूज
लॉकडाऊनमुळे सर्रासपणे मालाची वाहतूक करता येत नसल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. आता अनलॉक झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. जालन्यात गोंदी पोलिसांनी ५२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.
मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदिप जोगंदड, उपनिरीक्षक हानुमंत वारे यांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही जमादार भास्कर आहेर, कॉन्स्टेबल खराद आणि गीरी यांच्यासह महामार्गावर सापळा लावून बसले होते. आज सकाळी गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, उपविभागीय अधिकारी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदिप जोगदंड, उपनिरीक्षक हानुमंत वारे व पथकाने केली.