जालना - राज्यात लवकरच राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड होणार आहे. या निवडीत जालना-औरंगाबाद जिल्ह्यातील एकाची निवड राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने करावी, अशी मागणी भोकरदन येथील मुस्लीम समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. त्यांनी याबाबत काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.
'राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मुस्लीम समाजाला संधी द्या' - राज्यपाल नियुक्त सदस्य
राज्यात लवकरच राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड होणार आहे. या निवडीत जालना-औरंगाबाद जिल्ह्यातील एकाची निवड राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने करावी, अशी मागणी भोकरदन येथील मुस्लीम समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे.
'राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मुस्लीम समाजाला संधी द्या'
यावेळी जालना जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, हाजी मुजीब,सामाजिक कार्यकर्ते एजाज पठाण, नगरसेवक अब्दुल कादिर, काँग्रेसचे गट नेते संतोष अन्नदाते आदी उपस्थित होते.
Last Updated : Jun 21, 2020, 8:55 PM IST