जालना -दीड महिन्यापूर्वी दीपक हॉस्पिटलमध्ये काही तरुणांनी तोडफोड केली होती आणि याचा व्हिडिओ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे काढत होते. याच दरम्यान पोलिसांचे लक्ष शिवराज यांच्यावर गेले आणि त्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जबर मारहाण केली होती. याचा व्हिडिओ गुरुवारी (27 मे रोजी) व्हायरल झाल्यानंतर गवळी समाज आता आक्रमक झाला आहे. आणि मारहाण करणाऱ्या तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करीत आहेत. या संदर्भात आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.
'त्या' पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा.. भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी गवळी समाज आक्रमक - जालन्यात पोलिसांकडून तरुणाला मारहाण
दीपक हॉस्पिटलमध्ये काही तरुणांनी तोडफोड केली होती आणि याचा व्हिडिओ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे काढत होते. याच दरम्यान पोलिसांचे लक्ष शिवराज यांच्यावर गेले आणि त्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जबर मारहाण केली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गवळी समाज आता आक्रमक झाला आहे.
gawli-samaj-aggressive-
या संदर्भातील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा -जालन्यात हॉस्पिटलमध्ये पोलिसांची तरुणाला अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आज निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, सरचिटणीस तसा पीडित कार्यकर्ते शिवराज नारियलवाले, प्रतिष्ठित नागरिक बाबुराव सतकर, सुनील खरे, गणेशराव सुपारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Last Updated : May 28, 2021, 3:57 PM IST