महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात गॅस टँकर उलटल्याने चार तास वाहतूक खोळंबली - accident news jalna

बदनापूर तहसील कार्यालयाजवळ जालना-संभाजीनगर हायवेवर अनधिकृतरीत्या गतीरोधक टाकण्यात आलेले आहे. या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने येथे दररोज एक तरी छोटा मोठा अपघात होतो. यामुळे कित्येक वाहनांचे नुकसान होवून वाहनचालकांना प्राण गमवावे लागले आहे.

जालन्यात गॅस टँकर उलटल्याने गळतीच्या शक्यतेने चार तास वाहतूक खोळंबली

By

Published : Oct 12, 2019, 8:27 PM IST

जालना- येथील बदनापूर तहसील कार्यालयाजवळ जालना-औरंगाबाद हायवेवर भारत गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला आहे. रोडवर उभारण्यात आलेल्या गतिरोधकामुळे मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला. तर गॅस गळती होण्याच्या भितीने जवळपास तीन ते चार तास वाहतूक थांबवण्यात आली होती. अखेर पोलिसांनी चार तासानंतर हा टँकर लिकिज होत नसल्याची खात्री करुन पहाटे एकेरी वाहतूक सुरू केली.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकसित करण्याकडे गोव्याचे लक्ष - विश्वजीत राणे

बदनापूर तहसील कार्यालयाजवळ जालना-संभाजीनगर हायवेवर अनधिकृतरीत्या गतीरोधक टाकण्यात आलेले आहे. या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने येथे दररोज एक तरी छोटा मोठा अपघात होतो. यामुळे कित्येक वाहनांचे नुकसान होवून वाहनचालकांना प्राण गमवावे लागले आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात घडला. समोर जाणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्यामुळे त्या वाहनाला वाचवण्यासाठी जालनाकडे जाणाऱ्या टँकर चालकाने टँकर थांबवण्याचा प्रयत्न केला. यात हा टँकर (एमएच 12-5588) उलटून थेट हायवेचा एक भागच ब्लॉक झाला. तसेच टँकर चालक शाम बोराडे (वय २४) गंभीररीत्या जखमी झाला. चालकाच्या उजव्या पायाचा गुडघ्यापासून तुकडा होऊन रस्त्यावर पडला. चालकाला तत्काळ जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महामार्गावर कुठल्याही प्रकारचे गतिरोधक टाकता येत नाहीत. पंरतु, बदनापूर तहसील समोर हे गतीरोधक का टाकण्यात आले? हे न उलगडणारे कोडेच आहे. चार पाच महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांनी अभियंता यांना पत्र लिहून सदरील गतिरोधक काढण्याचे सांगितले होते. मात्र, गतीरोधक तसेच असल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हे गतिरोधक काढून टाकण्याची मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details