महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली अन् चार नराधमांची शिकार झाली; जालन्याच्या तरुणीवर मुंबईत अत्याचार - चिंताजनक

चेंबूरमधील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मराठवाड्यातील रहिवाशी असलेल्या एका तरुणीवर 4 अज्ञातांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चेंबूर येथे आपल्या भावाकडे आलेली ही तरूणी 7 जुलै रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. तेव्हा तिला विषारी ड्रग्ज पाजून तिच्यावर 4 नराधमांनी अत्याचार केले.

जालन्याच्या तरूणीवर मुंबईच्या चेंबूरमध्ये सामुहिक अत्याचार

By

Published : Aug 2, 2019, 10:51 PM IST

Updated : Aug 2, 2019, 11:18 PM IST

मुंबई - मराठवाड्यातील जालन्याची रहिवाशी असलेल्या एका तरूणीवर मुंबईच्या चेंबूरमध्ये सामुहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चेंबूर येथे आपल्या भावाकडे आलेली तरुणी 7 जुलैला मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली असता, तिच्यावर 4 नराधमांनी अत्याचार केले. यानंतर या तरूणीची तब्येत खालावत गेल्याने तिला मूळ गावी रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा ही बाब उघडकीस आली.

जालन्याच्या तरूणीवर मुंबईच्या चेंबूरमध्ये सामुहिक अत्याचार

या घटनेनंतर ही तरुणी आजारी पडली होती. त्यांनतर तरुणीच्या भावाने तिला गावाकडे बोलावून घेतले. गावी उपचार करू असे ठरवून 17 जुलैला ते तिला मुंबईहून जालन्याला नेण्यात आले.

गावात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी तिला 25 जुलै रोजी औरंगाबादमधील रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावरील उपचाराची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली, तेव्हा तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिच्या आई-वडिलांना सांगितले. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर 4 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. मात्र, कोणी अत्याचार केले हे तिला सांगता आले नाही.

या तरूणीची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याने तिच्याकडे अधिक विचारपूस केली नाही. डॉक्टरांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून तिच्या वडिलांनी याविषयी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. हा गुन्हा मुंबईत घडला असल्याने बेगमपुरा पोलिसांनी तो गुन्हा मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पुढील तपास चुनाभट्टी पोलीस करीत आहेत.

Last Updated : Aug 2, 2019, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details