जालना - मागील महिनाभरात शाळेला लागलेल्या सुट्ट्या आणि लग्नसराईचे दिवस पाहून नागरिक गावाला गेल्याचे लक्षात आल्यानंतर घरफोड्या करून रोख रकमेसह दागिने लांबवणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या प्रकरणात विविध सहा गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले सुमारे 200 ग्रॅम सोने ज्याची किंमत 6 लाख रुपये आहे. ते पोलिसांनी जप्त केले असून तीन आरोपींना अटक केली आहे.
सहा लाखाच्या मुद्देमालासह घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; जालना पोलिसांची कारवाई - gang
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आरोपींकडून परिसरात विविध ठिकाणी झालेल्या सहा घरफोड्यातील एकूण 208 ग्रॅम सोने जप्त केले आहे. पोलिसांनी अट्टल गुन्हेगार बियासिंग कलानी, अर्जुनसिंग प्रीतीसिंग कलानी, (रा. आजाद नगर नविन मोंढा जालना) आणि किसन सिंग राम सिंग टाक (रा. गुरुगोविंद सिंग नगर जालना) अशा तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

या सोन्याची बाजारामध्ये सहा लाख 86 रुपये एवढी किंमत आहे. ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह, गौर ज्ञानेश्वर, सानप जयसिंग परदेशी, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, कृष्णा तरंगे, विलास शेळके आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.