महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुगार अड्ड्यावर छापा ; तीन जण ताब्यात - jalna police

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

gambling in jalna
जुगार अड्ड्यावर छापा ; तीन जण ताब्यात

By

Published : Nov 4, 2020, 10:05 PM IST

जालना - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुगार अड्ड्यावर छापा ; तीन जण ताब्यात

अलंकार टॉकीज परिसरात एका खोलीमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला. हा जुगार अड्डा चालवणारे शिवलिंग वीर (वय 48), सागर बरवाल (वय 24), आसाराम वीर (वय - 65) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दहा हजार रुपये रोख, जुगाराचे साहित्य आणि टेबल-खुर्च्या असे सुमारे पंचवीस हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत ,गोकुळसिंग कायटे, हरीश राठोड, प्रशांत देशमुख, किरण मोरे, रवी जाधव, महिला पोलीस कर्मचारी पुनम भट यांच्या पथकाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details