जालना - जालना येथील औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत सकाळच्या सुमारास भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. यात २ ठार तर ६ जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत भट्टीचा भीषण स्फोट, २ ठार तर ६ जखमी
जालना येथील औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत सकाळच्या सुमारास भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. यात २ ठार तर ६ जखमी झाले आहेत.
जालना औद्योगीक वसाहतीतील एका स्टील कंपनीत भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 2 कामगार ठार तर 6 कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.औद्योगीक वसाहतीत गीताई स्टील कंपनीतली ही घटना आहे. स्टील वितळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. त्यामुळं 2 कामगार ठार झाले असून 6 जण जखमी झाले आहेत.
जवळ उभा असलेला ट्रकही या अपघातात जळून खाक झाला आहे. या घटनेनंतर पोलिस कंपनीत दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र स्फोट कसा झाला याबाबत पोलीस तपास करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.