जालना - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गरिबांना मोफत जीवनावश्यक धान्य पुरवठा करण्यास प्रारंभ केला असून प्रधानमंत्री गरीब कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व अन्न सुरक्षा शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ, 600 ग्रॅम चणाडाळ आणि 400 ग्रॅम तूर डाळीचे मोफत वाटप सुरू केले आहे. बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथील स्वस्त धान्य दुकानावर 23 मे रोजी सुरक्षित अंतर राखत तलाठी यांच्या उपस्थित लाभधारकांना धान्य वाटप करण्यात आले.
बदनापूरमध्ये तुरीसह चणाडाळ रेशनवर मोफत वितरण
बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथील स्वस्त धान्य दुकानातून 23 मे रोजी लाभधारकांना शारीरिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करीत तलाठी सुनील होळकर यांच्या उपस्थितीत धान्य वाटप करण्यात आले.
मागील तीन महिन्यापासून कोरोना संकटाचा सामना सरकार आणि नागरिक करीत आहेत. या संकटामुळे गरीब मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे हातात पैसा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासनाने शिधापत्रिका धारकांना मार्च व एप्रिल महिण्यात प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानामार्फत मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात गरिबांना दिलासा मिळाला
बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथील स्वस्त धान्य दुकानातून 23 मे रोजी लाभधारकांना शारीरिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करीत तलाठी सुनील होळकर यांच्या उपस्थितीत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी तलाठी सुनिल होळकर, ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई पवार, गजानन शिंगाडे, स्वस्त धान्य दुकानदार शहेजाद मीर्झा, संजय पवार, आदी उपस्थित होते.