जालना- जिल्हा परिषद कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल आज आला आहे. त्यामुळे आता पुढील चार-पाच दिवस तरी जिल्हा परिषद सामसूम राहील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषदेमधील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले चारही कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे पुढील 4-5 दिवस या इमारतीमध्ये कामकाज होईल की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. तसेच या अधिकाऱ्यांच्या संपर्कात कोणते कोणते कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी आले होते, याचाही तपास घेतल्या जात आहे.
जिल्हा परिषदेत खालच्या मजल्यावरील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या पत्नी तर वरच्या मजल्यावरील एक वरिष्ठ अधिकारी कोरणा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासोबत दोन चालक देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले चारही कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे पुढील 4-5 दिवस या इमारतीमध्ये कामकाज होईल की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान वरच्या मजल्यावर असलेल्या कृषी विभागाला सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस कर्मचाऱ्यांनी कामावर येऊ नये, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या असल्याचे समजते. जिल्हा परिषदेमधील दोन्ही मजल्यावर हे अधिकारी कोरोना पॉझिटिव आढळून आल्यामुळे आणि काल 9 ऑक्टोबर रोजी स्थायी समितीची बैठक झाली नाही. कदाचित याच कारणामुळे ती पुढे ढकलली असल्याचेही बोलले जात आहे. या अधिकाऱ्यांना कालच अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांच्या संपर्कात कोणते कोणते कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी आले होते, याचाही तपास घेतल्या जात आहे.