जालना- जिल्ह्यात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका प्रेमीयुगुलाला चार टवाळखोरांकडून मारहाण होत असल्याचे दृश्य होते. या व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबतची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही. मात्र, या घटनेत टोळक्याकडून विनयभंग झाल्याने पीडित आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
संतापजनक..! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न - प्रेमी युगुलाला मारहाण जालना
जालन्यातील देऊळगाव राजा शिवारातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व फौजफाटा याप्रकरणी तपास करत आहेत.
![संतापजनक..! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न viral-video-in-jalna](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5906086-thumbnail-3x2-jalna.jpg)
तरुणीचा विनयभंग
जालना 'प्रेमी युगुलाला मारहाण' प्रकरणी तपास सुरू...
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शिवारातील गोंदेगाव डोंगरांमधील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. यातील आरोपींना शोधण्यासाठी पोलीस गोंदेगाव शिवार पिंजून काढत आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
या व्हिडिओची अधिकृत माहिती ईटीव्ही भारतकडे नाही.
Last Updated : Jan 31, 2020, 10:32 PM IST