महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Criminals Attack on Jalna Police : चार सराईत गुन्हेगारांचा जालना पोलीस कर्मचाऱ्यांवर खंजिराने हल्ला; दोन पोलीस जखमी - सिद्धार्थ अॅग्रो प्रोडक्ट कंपनी पोलीस कर्मचारी हल्ला

बुधवारी उशिरा रात्री उशिरा खादगाव शिवारातील सिद्धार्थ अँग्रो प्रोडक्ट कंपनीमध्ये सराईत गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला केला. प्रभाकर वाघ आणि वेताळ अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सिद्धार्थ अँग्रो प्रोडक्ट कंपनीमध्ये सराईत गुन्हेगार पप्पू घोरपडे त्याचे इतर 3 साथीदार खंडणी वसुलीसाठी गोंधळ घालत हो

जखमी जालना पोलीस कर्मचारी
जखमी जालना पोलीस कर्मचारी

By

Published : Jan 5, 2022, 5:02 PM IST

Updated : Jan 5, 2022, 5:12 PM IST

जालना - सराईत गुन्हेगारांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर खंजीरने ( Four criminals stabbed Jalna police ) हल्ला केल्याची घटना घडली आहे. प्रभाकर वाघ आणि वेताळ अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे ( Two policemen were injured ) आहेत.

बुधवारी उशिरा रात्री उशिरा खादगाव शिवारातील सिद्धार्थ अॅग्रो प्रोडक्ट कंपनीमध्ये ( Siddharth Agro product company Jalna ) सराईत गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला केला. प्रभाकर वाघ आणि वेताळ अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे ( Injured Police Prabhakar Wagh ) आहेत. सिद्धार्थ अँग्रो प्रोडक्ट कंपनीमध्ये सराईत गुन्हेगार पप्पू घोरपडे ( Criminal Pappu Ghorpade ) त्याचे इतर 3 साथीदार खंडणी वसुलीसाठी गोंधळ घालत होते.

सराईत गुन्हेगारांचा जालना पोलीस कर्मचाऱ्यांवर खंजिराने हल्ला

हेही वाचा-Woman Beat Police in Police Station : तरुणीने चौकीतच केली पोलिसांना मारहाण, गुन्हा दाखल

चारही सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर खंजीराने वार-

कंपनी मालकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल वेताळ आणि प्रभाकर वाघ हे कंपनीत दाखल झाले. त्यांनतर पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारही सराईत गुन्हेगारांनी पोलीस कर्मचारी प्रभाकर वाघ यांच्या हातावर आणि वेताळ यांच्या छातीवर खंजीराने वार केले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चंदनझिरा पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा-Thief Girl Arrested Nagpur : शिक्षणात 'डबल एम.ए' मात्र चोरीच्या क्षेत्रात तरुणीची 'पीएचडी', २२ गुन्हे उघडकीस

Last Updated : Jan 5, 2022, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details