जालना -धारदार शस्त्रासह चार जणांना जालन्यातून अटक करण्यात आली आहे. शहाबाज खान जावेद खान (वय 30, राहणार तिथड, जिल्हा वाशिम), अविनाश विठ्ठल भालेराव (38, राहणार सिल्लोड), राहुल सुखदेव नवगिरे (36 राहणार सावरखेडा, तालुका सोयगाव) आणि अनिल नरसिंग सुरडकर (42, राहाणार सिल्लोड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.
तीन धारदार शस्त्रासह चार आरोपींना अटक - जालना क्राईम न्यूज
धारदार शस्त्रासह चार जणांना जालन्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन शस्त्रे जप्त करण्यात आली. चंदंनजिरा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
तीन शस्त्रे जप्त
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चंदंनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार एका चार चाकीची झडती घेतली. त्यामध्ये तीन धारदार शस्त्रे आढून आली. यामध्ये एक 35 सेंटीमीटरची कुकरी, 30 सेंटीमीटरचा चाकू आणि एक खंजीर यांचा समावेश आहे. पोलिसांनी शस्त्रे जप्त केली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठावळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, यांच्यासह अनिल काळे, शिवाजी पोहार, रवी देशमुख, रेखा वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.