बदनापूर (जालना) - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (दि. 17 नोव्हेंबर) आठवा स्मृतिदिन आहे. त्या निमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण करत असतात. मात्र, यंदा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आहे तेथूनच आदरांजली वाहण्याचे आवाहन केलेले होते. त्या आवाहानाला प्रतिसाद देत बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली अर्पण करण्यात आली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन; बदनापुरात शिवसैनिकांनी वाहिली श्रद्धांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवा स्मृतिदिन सोहळ्या निमित्त बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थित त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्रद्धांजली वाहताना शिवसैनिक
यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, भाऊसाहेब घुगे, जिल्हा परिषद सदस्य् कैलास चव्हाण, राजेश जऱ्हाड, रवीकुमार बोचरे, संतोष नागवे, भरत मदन, राजेंद्र जायस्वाल, शकुर बेग मिर्झा, नंदकिशोर दाभाडे, बळीराम मोरे, कैलास खैरे, सुनील बनकर, मनिष टाक उपस्थित होते. यावेळी जय भवानी–जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरे अमर रहे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.