महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदाराच्या मुलीच्या वाहनाने चौघांना उडवले, जालना जिल्ह्यातील घटना - car hit bike in jalna

परभणी जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या मुलीच्या वाहनाने चौघांना उडवल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये घडली.

former mp daughter car hit bike in jalna
विजय भांबळे मुलगी वाहन अपघात

By

Published : Dec 6, 2021, 12:23 AM IST

Updated : Dec 6, 2021, 1:31 AM IST

जालना -परभणी जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या मुलीच्या वाहनाने चौघांना उडवल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये घडली.

अपघात झालेल्या वाहनांचे दृश्य

हेही वाचा -Rajesh Tope on Omicron : '12 वर्षावरील मुलांना लसीकरणाची गरज' - राजेश टोपे

घनसावंगी तालुक्यातील दत्ता आसाराम तांगडे हे दुचाकीवर आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वाटूरहून परतूरकडे जात होते. दरम्यान परतूर शहरानजिक माजी आमदार विजय भांबळे यांच्या मुलीच्या वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर विजय भांबळे यांची मुलगी प्रतिक्षा भांबळे ही ड्रायव्हरसह फरार झाली.

या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा -Restrictions after omicron: केंद्र सरकार ठरवेल त्याप्रमाणे राज्यात निर्बंध लागू होतील - राजेश टोपे

Last Updated : Dec 6, 2021, 1:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details